कोविडमुळे मृत्यू झालेल्या अंगणवाडी सेविका ज्योत्स्ना भोईर यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान मंजूर

कोविड संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू झालेल्या अंगणवाडी सेविका ज्योत्स्ना भोईर यांच्या वारसांना ५० लाख रूपयाचं सानुग्रह अनुदान मंजूर झालं आहे.
ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील डवलेनगर लोकमान्य नगर पाडा नं.३ येथे राहणा-या ज्योत्स्ना भोईर ह्या अंगणवाडी सेविका म्हणून काम करत होत्या. कोरोनाच्या संकटकाळात कोविडचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकिय अधिका-यांच्या अधिपत्याखाली अंगणवाडी सेविकांना तात्पुरत्या स्वरूपात सलग्न करण्यात यावे या शासनाच्या आदेशाप्रमाणे भोईर ह्या कोरस आरोग्य केंद्रात कोरोना योध्दा म्हणून काम करत होत्या. त्या विभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन कोरोना सर्वेक्षण करीत असत, त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संपर्कात येऊन त्यांना कोरोना रोगाची लागण होऊन त्यात १९ सप्टेंबर २०२० रोजी त्यांचा मृत्यु झाला. कोरोना योध्दा म्हणून काम करत असताना योध्द्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांना मुख्यमंत्र्यांनी अनुदान घोषित केले होते. आमदार प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन पाठपुरावा करून भोईर कुटुंबास ५० लाखांची आर्थिक मदत शासनाकडून मिळवून दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading