कोरोना संशयितांसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात होम क्वारंटाईन साठी मुबलक बेडची व्यवस्था

कोरोना विरोधातील लढाईत ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मॅरेथॉन बैठका घेतल्या. डॉ शिंदे यांनी कल्याण – डोंबिवली , उल्हासनगर, अंबरनाथ येथे तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र कोविड हॉस्पिटल आणि स्वतंत्र क्वारंटाईन इमारतीचा घेतला आढावा घेतला. कल्याण – डोंबिवली महापालिकेत आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत शीळफाटा येथील 40 बेडचे निऑन हॉस्पिटल स्वतंत्र कोविड हॉस्पिटल रूपांतर करण्याचा निर्णय झाला. तर यासाठी आवश्यक असणाऱ्या व्हेंटिलेटर, PPE किट, N 95 मास्क आदींसाठी आपत्कालीन खर्चातून मान्यता देण्यात आली. कल्याण – डोंबिवली येथील इंडियन मेडिकल असोसिएशन , निमा डॉक्टर्स असोसिएशन आणि केम्पा डॉक्टर्स असोसिएशनचे डॉक्टर्स या कोविड रुग्णालयात सेवा देण्यास पुढे आले आहेत. तर उल्हासनगर महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या दालनात झालेल्या बैठकीत उल्हासनगर 4 येथील 50 बेडचे शासकीय प्रसूतीगृह रुग्णालय स्वतंत्र कोविड हॉस्पिटल रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर या दोन्ही कोविड हॉस्पिटलमध्ये खासदार डॉ श्रीकांत शिंदे स्वतः प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत भेट दिली आणि तयारीचा आढावा घेतला. तसेच कोरोना संशयितांसाठी तयार करण्यात आलेल्या अंबरनाथ येथील छाया रुग्णालयची पाहणी केली. अंबरनाथ नगरपालिकेने उभारलेल्या सेल्फ क्वारंटाईन इमारतीलाही डॉ शिंदे यांनी भेट दिली. याठिकाणी कोरोना संशयितासाठी स्वतंत्र 100 रूमची व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading