कोरोना विरूद्ध लढ्यासाठी टास्क फोर्स

ठाणे शहरामध्ये सापडलेल्या कोरोनाच्या बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्याव्यक्तींची आणि त्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी तयार करूनत्यांची तपासणी करण्याबरोबरच शहरामध्ये कोरोना कोवीड 19 बाधीत रूग्णावरउपचार करण्यासाठी सर्व अत्यावश्यक सुविधांसह रूग्णालय व्यवस्था तयारकरण्याचे आणि आवश्यकता भासल्यास एखादे खासगी रूग्णालय अधिगृहितकरण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी आज दिले.

कोरोना कोवीड 19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरातील विविधक्षेत्रातील मान्यवर लोकांचा समावेश असलेला टास्क फोर्सही निर्माणकरण्याबाबत त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना सूचना दिल्या. दरम्यान विलगीकरणकक्षासह शहरातील बेघर आणि स्थलांतरित मजुर, भिकारी आणि रोजंदारीवरकाम करणारे कामगार यांची प्रभागनिहाय शाळांमध्ये निर्माण करण्यात आलेल्यातात्पुरत्या निवारा गृहामध्ये तसेच दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथील निवाराकेंद्रामध्ये व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकायांना दिल्या.

ठाणे शहरामध्ये आतापर्यंत 11 कोरोना बाधीत रूग्णांची नोंद झाली असून यारूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आणि त्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्याव्यक्तींची यादी तयार करून त्यांची तपासणी प्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनीआरोग्य विभागाला दिल्या. यासाठी सहाय्यक आयुक्तांच्या नियंत्रणाखालीलयंत्रणा कार्यान्वित करावी त्याचा अहवाल रोजच्या रोज मुख्यालयाला सादरकरावा असे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी वैद्यकीय अधिकारी, संबंधित प्रभागाचासहाय्यक आयुक्त यांनी परिमंडळ उप आयुक्तांच्या संनियंत्रणाखाली समन्वयानेकाम करावे असे सांगितले.

दरम्यान भविष्यातील निकड लक्षात घेवून शहरामध्ये कोरोना कोवीड19 बाधीतरूग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व सुविधानियुक्त रूगणालय तयार करण्यातयावे. या रूग्णालयाची क्षमता, त्यासाठी आवश्यक असणारे व्हेंटिलेटर्स, औषधेयाची यादी तयार करून ते प्राधान्याने करून घेणेत यावे अशा सूचना त्यांनी आरोग्यविभागाच्या अधिकायांना दिल्या. आवश्यकता भासल्यास यासाठी खासगीरूग्णालये अधिगृहित करण्याचे आदेशही दिले. त्याचबरोबर महापालिकेच्यावतीनेकासारवडवली, भायंदरपाडा आणि कल्याणफाटा येथे तयार करण्यात आलेल्याविलगीकरण कक्षामध्ये आवश्यक असणाया खाटा, गादी, पाणी, बकेटस्, भोजनाची सुविधा यांचाही आढावा घेवून काही कमतरता असल्यास तातडीनेत्याची पूर्तता करण्यात यावी असे सांगितले.

शहरातील बांधकाम व्यावसायिक यांच्याकडे काम करीत असलेल्या मजुरांसाठीसंबंधित व्यावसायिकांनी काय व्यवस्था केली आहे, त्यांना पुरेशा वैद्यकीय सुविधामिळतात का, विलगीकरणाची व्यवस्था आहे का किंवा त्याठिकाणी सोशलडिस्टंन्स पाळले जात आहे का याची माहिती शहर विकास विभागाच्या अधिकायांनी प्रत्यक्ष पाहणी करून सादर करावी असेही त्यानी स्पष्ट केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading