कोरोना रूग्णांसाठी बाईक अॅम्ब्युलन्स पुन्हा रस्त्यावर

ठाणे महापालिकेच्या अडगळीत असलेल्या बाईक अॅम्ब्युलन्स कोरोना रूग्णांसाठी पुन्हा रस्त्यावर दिसू लागल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रूग्णसेवेसाठी महापालिकेनं ४५ लाख रूपये खर्च करून ३० बाईक अॅम्ब्युलन्सची खरेदी केली होती. परंतु त्याचा उपयोग झाला नव्हता. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रविंद्र मोरे यांनी आंदोलन करून कोरोना काळात बाईक अॅम्ब्युलन्सचा वापर करावा अशी मागणी केली होती. अखेर या आंदोलनाला यश आलं असून महापालिका आयुक्तांनी निर्णय घेऊन या बाईक अॅम्ब्युलन्स रूग्णसेवेसाठी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता अडगळीत पडलेल्या या बाईक अॅम्ब्युलन्स रूग्णसेवेसाठी पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading