कोरोना बाधीतांच्या संपर्कात येणा:यांची योग्य वेळेत तपासणी करा – महापौर नरेश म्हस्के यांचे प्रशासनाला आदेश

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. परंतुकोरोनाला आपल्याला हरवायचे असले तर कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात येतअसलेल्यांचा शोध घेऊन त्यांना होम क्वॉरान्टाईन किवा पालिकेच्या विलगीकरणकक्षात ठेवावे त्यांची वेळीच योग्य तपासणी करुन पुढील धोका टाळावा असेआदेश महापौर नरेश म्हस्के यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले आहेत.

गुरुवारी दुपारी त्यांनी लोकशाही आघाडीचे गटनेते नजीब मुल्ला यांच्यासमवेत महापालिका आयुक्त विजय सिंघल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनीकोरोनाला हरवायचे असेल तर आपल्याला विविध उपाय योजना करणो आणिकाही वेळेस कठोर निर्णय देखील घ्यावे लागणार असल्याचे सांगितले. सध्यामहापालिका हद्दीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत जात आहे. आता तररुग्णावर उपचार करणा:या डॉक्टरालासुध्दा कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे असे जर रुग्ण आढळत असतील तर त्यांच्या संपर्कात येणा:या प्रत्येकाचाशोध घेऊन वेळीच त्यावर योग्य ती खबरदारी घेणो गरजेचे असल्याचेही त्यांनीसांगितले आहे. त्यानुसार अशा संपर्कात येणा:यांचा शोध घेऊन त्यांना वेळीचक्वॉरान्टाइन करावे जेणो करुन भविष्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावालाआपल्याला रोखण्यास मदत होईल. त्यानुसार याची काळजी घेऊन पालिकेनेत्यांच्या टीम तयार करुन तशी पाहणी करुन, त्या संशयीतांचे तपासणी अहवालहीतत्काळ कसे उपलब्ध होतील यासाठी देखील पावले उचलणो गरजेचे असल्याचेहीत्यांनी यावेळी स्पष्ट केले. यासाठी काम करणा:या टीमचेही यावेळी महापौरांनीत्यांचे कौतुक केले. तसेच प्रत्येक अधिका:यांवर कामाची जबाबदारी फिक्सकरावी जेणो करुन मुंबईत ज्या पध्दतीने कोरोना वाढत आहे, तसा फैलाव ठाण्यातहोऊ नये यासाठी ही जबाबदारी देण्यात यावी. शिवाय मुंबईतून कोणी ठाण्यात येतअसेल अथवा देशातील इतर भागातून कोणी येत असेल तर त्याचाही आता शोधघेऊन त्यांचीही तपासणी केली जावी अशा सुचनाही त्यांनी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading