कोरोनाच्या निर्बंधांमुळे दहीहंडी उत्सवांवर विरजण

ठाण्यामध्ये कोरोनाच्या निर्बंधामुळे कुठेही दहीहंडी उत्सव साजरा होऊ शकला नाही. ठाण्यातील दहीहंडी उत्सव हा मोठा प्रसिध्द आहे. ठाण्यातील दहीहंडी उत्सवातच ९ थर लावण्याचे विक्रम अनेकदा झाले. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी दहीहंडी उत्सवाला मोठी प्रसिध्दी मिळवून दिली. त्यांच्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी या उत्सवावर कळस चढवला. मात्र आता आव्हाड यांनी दहीहंडी उत्सव बंद केला आहे तर यंदा कोरोनाच्या निर्बंधांमुळे कोणताच उत्सव होऊ शकला नाही. टेंभीनाका येथील आनंद दिघेंची दहीहंडी, रंगो बापूजी चौकातील राजन विचारेंची दहीहंडी, रहेजा जवळील आमदार रवींद्र फाटक यांची दहीहंडी, वर्तकनगर येथील प्रताप सरनाईक यांचा दहीहंडी उत्सव यापैकी कोणीच उत्सव साजरा करू शकले नाहीत. अनेक मंडळांनी त्याऐवजी आरोग्य शिबीरांचं आयोजन केलं होतं. ठाण्यातील टेंभीनाका येथील प्रसिध्द अशा दहीहंडी उत्सवात गावदेवी येथील गोविंदा पथकानं आणि शिवतेज महिला गोविंदा पथकानं मानाच्या दहीहंडीला सलामी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading