कोपरी पुलाची गर्डर बसविण्यासाठी यंत्रणा सज्ज

पूर्वदृतगती महामार्गावरीलअरूंद कोपरी पुलामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतुन सुटका मिळवण्यासाठी कोपरी रेल्वे पुलाचे  काम आज रात्रीपासून सुरू होणार आहे. या कामासाठी लागणारी यंत्रणांची नियोजन व्यवस्था बघण्यासाठी आज खासदार राजन विचारे यांनी रेल्वेचे प्रकल्प व्यवस्थापक लोलगे यांच्यासमवेत पाहणी केली. 1958 साली बांधलेला या रेल्वे पुलाला 63 वर्षे पूर्ण झाली होती 1995 नंतर पूर्व दुती महामार्गावरील रेल्वे पूल सोडून दोन्ही बाजूस 8 मार्गिका करण्यात आल्या होत्या परंतु चार मार्गिका असल्याने गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत होता. नवीन पुलाचा प्रस्ताव निधीअभावी रखडला होता. खासदार राजन विचारे यांनी या पुलाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी एम एम आर डी चे आयुक्त युपीएस मदान यांच्याकडे सन २०१५ पासून पाठपुरावा सुरू केला त्यासाठी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2016 मध्ये 258 कोटी ची मान्यता मिळाली. या कामाची पुन्हा पाहणी करून विचारे यांनी या प्रकल्पामध्ये 4+4 लेन करून शेजारी होणाऱ्या नवीन रेल्वे स्थानकातील वाहतुक कोंडी होऊ नये या दृष्टिकोनातून ज्ञानसाधना ते भास्कर कॉलनी या ठिकाणी भुयारीमार्ग तसेच चिखलवाडी येथे हे पावसाळ्यात होणारी घरबुडी टाळण्यासाठी नाल्याचीव्यवस्था करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या त्याप्रमाणे नियोजित आराखड्यामध्ये पुन्हा बदल करून रेल्वेकडून परवानगी मिळवली. कोपरी रेल्वे पुल धोकादायक झाल्याचे रेल्वेचे पत्र हाती लागताच सर्व प्रसारमाध्यमांना घेऊन जून 2017 ला त्याचा पर्दाफाश केला. त्यानंतर 2018 मध्ये या कोपरी रेल्वे पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तर नोव्हेंबर 2020 मध्ये पुन्हा पाहणी करून रेल्वेच्या आणि एमएमआरडीएच्याअधिकाऱ्यांना फेज 1 च्या कोपरी पुलाची गर्डर  लॉन्च करूनफेब्रुवारी मार्च पर्यंत हा पूल नागरिकांसाठी खुला करून द्यावा आणि त्यानंतर फेज २ च्या गर्डरचे काम सुरुकरण्याच्या सूचना अधिक-यांना दिल्या. या पूलाच्या गर्डर साठी काही कालावधीसाठी हा मार्ग बंद करावा लागणार होता त्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांना तात्काळ परवानगी देण्याची विनंती केली. आनंद नगर येथील भुयारी मार्ग २+२  मार्गिकेचाकरावा तसेच पुढे सरकविण्यात आलेला ज्ञानसाधना कॉलेज सर्विस रोड  ते गुरुद्वाराशेजारीअसलेले मारुती मंदिरा  दरम्यान नव्याने होणाऱ्या पादचारी पुलाला लिफ्ट बसवण्यात यावी अशी मागणी राजन विचारे यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading