कोपरी आठ पदरी पूलासाठी वाहन चालकांना जवळपास एक वर्षाहून अधिक काळ प्रतिक्षा करावी लागणार

कोपरी पूलावर गर्डर टाकण्याचं काम पूर्ण झालं असलं तरी संपूर्ण आठ पदरी पूलासाठी वाहन चालकांना जवळपास एक वर्षाहून अधिक काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. सलग दोन आठवड्याच्या शनिवार-रविवारी हे गर्डर बसवण्याचं काम करण्यात आलं. हे काम यशस्वीरित्या पूर्ण झालं असलं तरी एकत्रितपणे ८ पदरी पूलासाठी वाहन चालकांना प्रतिक्षाच करावी लागणार आहे. गर्डर टाकलेल्या ठिकाणी आता डांबरीकरण केलं जाणार असून या मार्च अखेरीपर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर यावरून वाहतूक सुरू होऊ शकेल. पूर्वी असलेल्या पूलाची उंची वाढवण्यात आली असून अतिरिक्त मार्गिका तयार झाल्या आहेत. मात्र जुन्या पूलाची उंची वाढवण्याचं काम अद्याप सुरूही झालेलं नाही. जुन्या पूलावरील वाहतूक नवीन मार्गिकेवरून वळवल्यानंतर जुन्या पूलाची उंची वाढवण्याचं काम सुरू होणार आहे. त्यामुळं आठ पदरी पूलावरून वाहतूक सुरू व्हायला एक वर्षाहून अधिक काळ लागण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading