कोणत्याही ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित न करता, वीज बिलाची थकबाकी वसुली करण्याचे उद्धिष्ट ठेवावे – गोविंद बोडके

महावितरण कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी भांडूप परिमंडल कार्यालयात भेट देऊन भांडूप परिमंडल अंतर्गत ठाणे, वाशी आणि पेण या तिन्ही मंडल कार्यालयातील वसुली तसेच इतर महत्वाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी बोडके यांनी उच्चदाब तसेच घरगुती, व्यवसायिक, औद्योगिक ग्राहकांच्या वीजबिल वसुलीबाबत आढावा घेतला तसेच थकबाकी असलेली रक्कम वसूल करण्यासाठी अभियंत्यांनी ग्राहकांच्या सोसायटी मध्ये जाऊन वीज बिलाबाबत माहिती द्यावी तसेच वीज बिल भरण्यासाठी आग्रह करावे. तसेच, ४०–२००अँम्पियर चे जुने आणि नादुरुस्त झालेले वीज मीटर बदलण्यात यावे. २० के डब्ल्यू च्या वरती भार असणाऱ्या ग्राहकांचे योग्य पद्धतीने रीडिंग घेण्यासाठी बोडके यांनी सूचना केल्या. भांडूप परिमंडल अंतर्गत सुरु असलेल्या स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला. स्वंयमस्फुर्तपणे विविध कार्यालयात सुरु असलेल्या स्वच्छता अभियानाबाबत त्यांनी कौतुक केले. स्वच्छता मोहीम राबवून कार्यालयात नादुरुस्त असलेले साहित्य काढून कार्यालयाचा परिसराला सुंदर, स्वच्छ ठेवावे अशा सूचना केल्या. महावितरणच्या कर्मचारी आणि अभियंत्यांनी चांगली ग्राहक सेवा देण्यासाठी तत्पर राहावे. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करावे. त्यांना नवीन वीज जोडणी वेळेत होईल याची दक्षता घ्यावी. याशिवाय, एप्रिल ते ऑगस्ट पर्यंत असलेल्या ग्राहकांच्या वीज देयकाची थकबाकी वसूल करतांना एकही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित न करता, १००% वसुली करण्याचे उद्धिष्ट बोडके यांनी दिले. भांडूप परिमंडल कार्यालयाचा आवारात असलेल्या स्काडा सेंटरची पाहणी बोडके यांनी केली. तसेच स्काडा सेंटरला पूर्णपणे कार्यन्वित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले यांना दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading