कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख काम करण्याचा शासकीय कर्मचा-यांना सल्ला

कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख काम करण्याचा सल्ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक महेश पाटील यांनी शासकीय कर्मचा-यांना दिला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दक्षता जनजागृती सप्ताह राबवला जात आहे. यानिमित्तानं जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचा-यांसाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा सल्ला दिला. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करत सरकारी कामामध्ये पारदर्शकता ठेवून अधिकारी-कर्मचा-यांनी शासकीय सेवांचा लाभ जलद गतीनं देण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. पोलीस उपअधिक्षक मदन बल्लाळ यांनी भ्रष्टाचार निर्मूलनासंदर्भातील विविध लघुचित्रफिती यावेळी उपस्थितांना दाखवल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading