कोंकण विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक -2023विभागात एकूण ९१.०२ टक्के मतदान

कोंकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी द्विवार्षिक निवडणूकीसाठी आज दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी विभागातील पाचही जिल्ह्यांच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण ९१.०२ टक्के मतदान झाले. मतदार यादीनुसार विभागामध्ये १७ हजार ९ पुरुष तर २१ हजार ५२० स्त्री मतदार असे एकूण ३५ हजार ५२९ शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी १६ हजार १२८ पुरुष तर १८ हजार ९४२ स्त्री असे एकूण ३५ हजार ७० शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. विभागातील जिल्हानिहाय मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे :-

ठाणे जिल्ह्यात ८८.८६ टक्के मतदान झाले असून, ६ हजार २९ पुरुष तर ९ हजार २७१ स्त्री मतदार असे एकूण १५ हजार ३०० शिक्षक मतदारांपैकी ५ हजार ६३४ पुरुष तर ७ हजार ९६१ स्त्री असे एकूण १३ हजार ५९५ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
पालघर जिल्ह्यात ८७.८७ टक्के मतदान झाले असून, २ हजार ४२७ पुरुष तर ४ हजार ४१७ स्त्री मतदार असे एकूण ६ हजार ८४४ शिक्षक मतदारांपैकी २ हजार ३०७ पुरुष तर ३ हजार ७०७ स्त्री असे एकूण ६ हजार १४ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
रायगड जिल्ह्यात ९३.५६ टक्के मतदान झाले असून, ४ हजार ३५५ पुरुष तर ५ हजार ७४६ स्त्री मतदार असे एकूण १० हजार १०१ शिक्षक मतदारांपैकी ४ हजार १४३ पुरुष तर ५ हजार ३०७ स्त्री असे एकूण ९ हजार ४५० शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
रत्नागिरी जिल्ह्यात ९४.७३ टक्के मतदान झाले असून, २ हजार ७४२ पुरुष तर १ हजार ३७८ स्त्री मतदार असे एकूण ४ हजार १२० शिक्षक मतदारांपैकी २ हजार ६२५ पुरुष तर १ हजार २७८ स्त्री असे एकूण ३ हजार ९०३ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९७.४१ टक्के मतदान झाले असून, १ हजार ४५६ पुरुष तर ७०८ स्त्री मतदार असे एकूण २ हजार १६४ शिक्षक मतदारांपैकी १ हजार ४१९ पुरुष तर ६८९ स्त्री असे एकूण २ हजार १०८ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कोकण विभाग शिक्षक मतदार संघ तथा उप आयुक्त (सामान्य) कोकण विभाग मनोज रानडे यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading