केंद्र शासनानं जाहीर केली लसींची कमाल किंमत

केंद्र शासनानं खाजगी रूग्णालयातून लसीकरण करताना जादा दर आकारले जाऊ नये याकरिता कमाल किंमत जाहीर केली आहे. लस उत्पादकांकडून खाजगी रूग्णालयांना एका ठराविक दरानं लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. आणि सेवाशुल्क म्हणून या रूग्णालयांना दीडशे रूपये आकारता येणार आहेत. कोविशिल्डचा एक डोस हा ६०० रूपयाला दिला जाणार असून त्यावर ५ टक्के दरानं जीएसटी अधिक दीडशे रूपये सेवाशुल्क असं ७८० एका डोससाठी इतक्या कमाल दरानं विकण्याचं खाजगी रूग्णालयांना बंधन असणार आहे. कोवॅक्सिनसाठी १२०० रूपये अधिक ६० रूपये अधिक दीडशे असे १४१० रूपये तर स्पुटनिक व्ही साठी ९४८ अधिक ४७ अधिक सेवाशुल्क दीडशे रूपये असे ११४५ रूपये कमाल शुल्क राहणार आहे. राज्य शासनानं या दरांवर देखरेख ठेवावी असे आदेशही केंद्र शासनानं दिले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading