कारची काच फोडून चोरी करणा-यास रंगेहात अटक

नौपाडयात रस्त्यावर पार्क केलेल्या कारची काच फोडून कार टेप चोरी करणाऱ्या भुरटया चोराला कार मालकाने पकडुन पोलिसांच्या स्वाधीन केले. अनिल प्रजापती असे या चोरट्याचे नाव असून वाशी येथे राहणारे अनंत गुप्ता यांनी त्यांची कार गोखले रोड येथील मॅकडोनाल्ड समोर उभी केली होती. रात्री पावणे बाराच्या सुमारास प्रजापती याने त्यांच्या कारची काच फोडून गाडीतील कारटेप चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी गुप्ता तिथे आल्याने हा चोरीचा प्रयत्न उधळला गेला. याप्रकरणी गुप्ता यांच्या तक्रारीवरून नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading