कापुरबावडी येथील सिनेवंडर मॉल आणि कोरियन बिझनेस पार्क येथे आज रात्री साडेआठच्या सुमारास आग

कापुरबावडी येथील सिनेवंडर मॉल आणि ओरियन बिझनेस पार्क येथे आज रात्री साडेआठच्या सुमारास आग लागली. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे आलेल्या तक्रारीवरून आपत्ती व्यवस्थापन पथकाचे अधिकारी कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ओरियन बिझनेस पार्क ही तळ+ ५ मजली इमारत असून ८० ते ९० ऑफीसेस या ठिकाणी आहेत. तिथेच बाजूला असलेल्या सिने वंडर मॉल मध्येही आग लागली आहे. यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. ओरियन बिझनेस पार्क मधील पझल पार्किंग मधील वाहनांना आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading