कल्याण मधील किल्ले दुर्गाडी वरील दुर्गाडी देवीची खासदार श्रीकांत शिंदे यांनी सपत्नीक केली आरती

खासदार डॅा श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते कल्याणच्या प्रसिद्ध दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीची आरती करण्यात आली. दुर्गाडी किल्ल्याला आणि देवीला शिवकालीन इतिहास आहे . राजकीय दृष्ट्या देखील या दुर्गाडी किल्ल्याला महत्व असून शिवसेनेकडून दरवर्षी दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी नवरात्रीत या दुर्गाडी किल्ल्यावर लाखो नागरिक येत असतात किल्ल्याभोवती मोठी जत्रा भरत असते. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी या दुर्गाडी किल्ल्याच्या डाग डुजी साठी निधी मंजूर करण्यात आलाय. कामदेखील सुरू करण्यात आले आहे , दुर्गाडी किल्ल्या लगत म्युझियम उभारण्याचं काम सुरू आहे या म्युझियमच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या आरमाराचा इतिहास दाखवला जाणार आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading