कल्याणच्या प्रथमेश डोळेचा आंतरराष्ट्रीय परिषदेत मराठीचा झेंडा

इंडोनेशियातील नुसादुवा येथे झालेल्या बाली एशिया इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स या जगभरातील विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत कल्याणच्या प्रथमेश डोळे यानं मराठीचा झेंडा रोवला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींवर उत्कृष्ट भाषण केल्याबद्दल त्याला मोस्ट आऊटस्टँडींग डेलिगेटस् हा पुरस्कार मिळाला आहे. असा पुरस्कार मिळवणारा प्रथमेश हा महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी आहे. जागतिक पातळीवर तरूण अभ्यासक तयार व्हावेत या उद्देशानं ही परिषद आयोजित केली जाते. या परिषदेत प्रथमेश डोळेला क्रिप्टो करन्सी इन सस्टेनेबल इकॉनॉमी हा विषय देण्यात आला होता. प्रथमेशनं अत्यंत प्रभावीपणे या विषयाची मांडणी केली. सिध्दार्थ कॉलेज ऑफ लॉ मध्ये प्रथमेश कायद्याचं प्रशिक्षण घेत असून त्याने फ्रेंच भाषेची पदवीही मिळवली आहे. इंटरनॅशनल ग्लोबल नेटवर्कचे अध्यक्ष महम्मद फरिझल यांच्या उपस्थितीत प्रथमेशला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रथमेश हा सामनाचे ज्येष्ठ प्रतिनिधी माधव डोळे यांचा पुत्र आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading