विद्या प्रसारक मंडळाच जोशी – बेडेकर महाविद्यालय आज ठाणे महापालिकेन ताब्यात घेतलं आहे. करोना
रुग्यांसाठी रुग्णालय उभारण्या करीता हे महाविद्यालय ताब्यात घेण्यात आलं आहे. महापालिकेन काल या
संदर्भात मंडळाला पत्र पाठवून आज हे महाविद्यालय ताब्यात घेतल्याचं सांगण्यात आलं. सध्या
महाविद्यालयात पेपर तपासणीच काम सुरु आहे यासाठी शिक्षकवृंद काम करत आहे. पण अचानक हे
महाविद्यालय ताब्यात घेण्यात आल्यामुळे महाविद्यालयातील काम रखडण्याची शक्याता दिसत आहे.