ओरिगामी ठाणे ट्रस्टतर्फे ओरिगामी कलेमध्ये रस वाढावा यासाठी प्रदर्शन आणि कार्यशाळेचं आयोजन

ओरिगामी ठाणे ट्रस्टतर्फे ट्रस्टच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त ओरिगामी कलेमध्ये रस वाढावा यासाठी ओरिगामी प्रदर्शन आणि ओरिगामी विषयक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. ओरिगामी प्रदर्शन हे १२ ते १४ ऑक्टोबरला होणार असून ओरिगामीची स्पर्धा १३ ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे. मधु हळदणकर सभागृहात प्रदर्शन आणि स्पर्धा होणार आहे. अधिक माहितीसाठी ९९२०३ ९६३२६ या दूरध्वनी क्रमांकावर डॉ. प्रकाश सांगुर्डेकर यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. ओरिगामी ठाणे ट्रस्टतर्फे गेली १० वर्ष ओरिगामी कलेमध्ये लोकांचा रस वाढावा यासाठी विविध प्रदर्शन आणि स्पर्धांचं आयोजन केलं जात आहे. ट्रस्टतर्फे आत्तापर्यंत ठाणे, मुंबईपासून अगदी अक्कलकोट, मलकापूर पर्यंत प्रदर्शन आणि कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. ट्रस्टतर्फे आत्तापर्यंत १२ प्रदर्शनं आणि विविध कार्यशाळांमधून ६ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना ओरिगामीची कला शिकवण्यात आली आहे. ओरिगामीमुळं लहान मुलांची एकाग्रता वाढते. ज्या विद्यार्थ्यांना ओरिगामी प्रदर्शनात आपली कला सादर करायची आहे त्यांनी ओरिगामीची मॉडेल्स ११ ऑक्टोबर पर्यंत ओरिगामी ठाणे ट्रस्टकडे सादर करायची आहेत. स्पर्धेसाठी कागद हा ट्रस्टतर्फे दिला जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading