ऑलिम्पिक डे आणि टोकियो ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी सेल्फी पॉईंटचे आयोजन

क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या मार्फत ऑलिम्पिक डे आणि टोकियो ऑलिम्पिक साठी निवड झालेल्या राज्यातील दहा खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी सिग्नेचर कॅम्पेन आणि सेल्फी पॉइंट १५ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या स्वाक्षरीने खेळाडूंना शुभेच्छा देवून करण्यात येणार आहे.
तसेच ठाणे जिल्ह्यातील 18 वर्षावरील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंसाठी कोविड लसीकरण मोहिम आणि विविध ठिकाणी सेल्फी पॉइंट बनविण्यात आले आहेत. त्यात ठाणे महानगरपालिका अंतर्गत दादोजी कोंडदेव स्टेडीयम आणि विष्णुदास भावे सभागृह, वाशी या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 18 वर्षावरील खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा तज्ञ, क्रीडा पंच आणि पुरस्कारार्थिनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading