एमआयडीसीची पाईपलाईन फुटल्यामुळे ठाणे शहर आणि आजूबाजूचा पाणीपुरवठा खंडीत

एमआयडीसीची पाईपलाईन फुटल्यामुळे ठाणे शहर आणि आजूबाजूचा पाणीपुरवठा खंडीत झाला आहे. आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शीळफाटा येथे एमआयडीसीच्या पाईपलाईनचं दुरूस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर ही पाईपलाईन पुन्हा काटई नाका येथे संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास फुटली आहे. ही पाईपलाईन १७१२ मिलीमीटर व्यासाची असून घटनास्थळी एम.आय.डी.सी. कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे. यामुळे ठाणे शहर, मिरा भाईंदर, कल्याण-डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा खंडीत झाल्याचं एम.आय.डी.सी. कडून कळवण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading