एक गाव एक होळी या संकल्पनेतून कोळी बांधवांनी साजरी केली ठाण्यातील चंदेनी कोळीवाडा परिसरात होळी

ठाण्यातील चेंदनी कोळी वाडा या ठिकाणी कोळी बांधवांनी एकत्र जमत एक गाव एक होळी हा सण साजरा केला. कोविड नंतर कोळी बांधवांनी मोठ्या जल्लोषात एकत्र जमत होळी सण साजरा केला. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात शिमगा म्हणजेच होळी हा सण साजरा करण्याची पारंपारिक प्रथा चालत आली आहे. त्याचप्रमाणे ठाण्यातील चेंदनी कोळीवाडा येथे एक गाव एक होळी हि प्रथा गेली अनेक वर्षांपासून जोपासली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीच्या पूर्वसंध्येला चेंदणी कोळीवाडा येथे कोळी बांधवानी कोळी समाज ट्रस्टच्या माध्यमातून एकत्र येवून पारंपारिक पद्धतीने शिमगा म्हणजेच होळीचा सण साजरा केला. यावेळी कोळी समाजाच्या महिला आणि पुरुषांनी पारंपारिक वेशभूषा करत होळी भोवती फेर धरल्याने होळीचा उत्साह द्विगुणीत झाला होता. आमच्या दाराशी हाय शिमगा, सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा आशा पद्धतीने गाण्याच्या तालावर कोळी बांधव नृत्य करताना दिसले. तसेच या उत्सवात तरुण तरुणींसह जेष्ठांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसुन आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading