एका ज्येष्ठ नागरिकानं मांजराला सोळाव्या मजल्यावरून फेकून दिल्यानं मांजराचा मृत्यू

शेजारच्या घरातील मांजरामुळे त्रासलेल्या एका ज्येष्ठ नागरिकानं पर्शियन जातीच्या मांजराला सोळाव्या मजल्यावरून खाली फेकून दिल्यानं या मांजराचा मृत्यू झाला. एव्हरेस्ट कन्ट्रीसाईड कॉम्प्लेक्समध्ये राहणा-या शिवराम पांचाळ यांच्या घरी ही मांजर नेहमी येत असे. त्यांच्या घरातील लहान मुलाला या मांजरांनी काही इजा करू नये म्हणून पांचाळ हे नेहमी चिंतेत असत. काल नेहमीप्रमाणे ही मांजर जेव्हा पांचाळ यांच्या घरी आली त्यावेळी संतप्त झालेल्या पांचाळ यांनी तिला सोळाव्या मजल्यावरून खाली फेकून दिलं. यामध्ये या मांजरीचा मृत्यू झाला. पोलीसांनी याप्रकरणी पांचाळ यांना अटक केली. मात्र न्यायालयानं त्यांची जामिनावर मुक्तता केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading