उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिका-यांनी केला जिल्ह्याचा दौरा

ग्रामीण जीवन्नोती अभियान अर्थात उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांनी ठाणे जिल्ह्याचा दौरा करत अभियानातर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. शहापूर तालुक्यातील स्वप्नपूर्ती आदर्श प्रभाग संघाला भेट देऊन त्यांनी येथील महिलांशी संवाद साधला. महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या मार्फत 2017 पासून उमेद अभियान राबविले जाते. या अभियानांतर्गत महिलांचे छोटे-छोटे बचत गट अर्थात स्वयं सहाय्यता समूह तयार केले जातात. काही स्वयं सहाय्यता समूह एकत्रित करून त्यांचा प्रभाव संघ तयार केला जातो. असे जिल्ह्यात 33 प्रभाग संघ आहेत. हे प्रभाव संघ धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी केलेले आहेत. या संघाच्या माध्यमातून गृहपयोगी वस्तूपासून, विविध जीवनाश्यक वस्तू तयार करून त्यांची विक्री केली जाते. महिला विविध लघुउद्योग या अभियानातर्गत उभारतात. वसेकर यांनी अशाच प्रभाग संघाना भेट देऊन संस्था बांधणी, क्षमता बांधणी, आर्थिक समावेशन, उपजीविका या बाबत माहिती देऊन स्वयं सहाय्यता गटातील महिलांसोबत चर्चा केली. यावेळी उमेद अभियानांतर्गत मिळणाऱ्या निधीचा उपयोग उपजीविका साधन तयार करण्यासाठी होत असल्याची प्रांजल कबुली महिलांनी दिली. तसेच अभियानाच्या आर्थिक पाठबळतेमुळे हळदीची शेती करण्यास प्रोत्साहन मिळाल्याचेही महिलांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading