उद्या दुपारी १ वाजून ५८ मिनिटांनंतर गौरी आणण्याचा मुहुर्त – दा. कृ. सोमण

ज्येष्ठा गौरींचं उद्या घरोघरी आगमन होत आहे. ज्येष्ठा गौरींचं आगमन हे अनुराधा नक्षत्रावर होतं. उद्या दुपारी १ वाजून ५८ मिनिटांनी अनुराधा नक्षत्र असल्यामुळं त्यानंतर गौरी आणता येतील अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना गौरींचं आगमन होतं. चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरींचं पूजन होतं, तर चंद्र मूळ नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरींचं विसर्जन केलं जातं असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. ज्येष्ठा गौरी, चैत्र गौरी, मंगळागौरी, हरितालिका आणि नवरात्रात पार्वतीची पूजा केली जाते असंही त्यांनी यावेळी सांगितलं. गौरी आगमन म्हणजे सासरी गेलेल्या मुलीला माहेरी येण्याचा हक्काचा दिवस. गौरी आगमनाच्या दिवशी माहेरी आलेल्या मुलीची ओटी भरून पूजा केली जाते. काही ठिकाणी पूर्णाकृती तर काही ठिकाणी खड्याच्या गौरी बसवण्याची पध्दत आहे. ज्येष्ठा गौरींचं आगमन, पूजन आणि विसर्जन मुहुर्तावरच केलं जातं. गौरींचं पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर केलं जातं. बुधवार म्हणजे २६ ऑगस्ट रोजी दिवसभर ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळं ज्येष्ठा गौरींचं पूजन दिवसभर करता येईल तर गुरूवारी म्हणजे २७ ऑगस्टला १२ वाजून ३६ मिनिटांनी मूळ नक्षत्र लागत असल्यामुळं त्यानंतर ज्येष्ठा गौरींचं विसर्जन करता येईल असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading