उथळसर जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा शनिवारी २४ तास बंद राहणार

उथळसर जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा शनिवारी २४ तास बंद राहणार आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभागसमिती जेल जलकुंभावरुन पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिनीवर के-व्ह‍िला येथील गळती थांबविण्याकरिता आवश्यक दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी, ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शनिवार दि. 27.11.2021 रोजी सकाळी 9.00 ते रविवार दि.28.11.2021 रोजी 9.00 वाजेपर्यत 24 तासांचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे. सदर दिवशी उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील राबोडी क्र. 1 व 2, के-व्ह‍िला, आकाशगंगा, पंचगंगा, उथळसर, सेंट्रल जेल परिसर, पोलीस लाईन परिसर व नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील एन.के.टी. कॉलेज परिसर, खारकर आळी, पोलीस हायस्कूलच्या काही भागात पाणी पुरवठा 24 तासांसाठी पुर्णपणे बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पुर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading