इमारतीच्या सर्व्हीस लिफ्टमध्ये चिरडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू

इमारतीच्या सर्व्हीस लिफ्टमध्ये चिरडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. काल दुपारी ही घटना घडली. हिरानंदानी इस्टेट गृहसंकुलाजवळ क्वांटम या तळ अधिक सोळा मजली इमारतीचं बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या १५व्या मजल्यावर सर्व्हीस लिफ्टमधून इमारतीचं काम करत असताना अभिषेक विश्वकर्मा हा लिफ्टमध्ये अडकून पडला. त्याला सोडवण्यासाठी महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाचे जवान, कासारवडवली पोलीसांचं पथक तात्काळ दाखल झाले. पण विश्वकर्माची मान लिफ्टमध्ये अडकल्यानं सुटका करण्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू ओढवला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading