इंदिरानगर कडून सावरकरनगरकडे जाणाऱ्या वाहनांना कामगार चौकात वाहनांना प्रवेश बंदी

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील ज्ञानेश्वरनगर ते इंदिरानगर दरम्यान डी. मार्ट सावरकरनगरकडे जाणाऱ्या कामगार चौक येथील नाल्याचे कल्व्हर्टची पूर्णबांधणी काम सुरु आहे. त्यामुळे 26 नोव्हेंबर 2021 ते 30 एप्रिल 2022 पर्यंत इंदिरानगर कडून सावरकरनगर कडे जाणाऱ्या कामगार चौक येथे सर्व वाहतूकीस प्रवेश बंद करुन वाहतूक वळविण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी कळविली आहे. सावरकरनगर कडून नितिन कंपनीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कामगार चौक येथे ‘प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने सावरकरनगर-यशोधननगर-लोकमान्यनगर रोड नं. 22-इंदिरानगर मार्गे इच्छित स्थळी जातील. नितिन कंपनी कडून सावरकरनगर कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कामगार चौक येथे ‘प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही सर्व प्रकारची वाहने इंदिरानगर-रोड नं. 22- लोकमान्यनगर-यशोधननगर मार्गे इच्छित स्थळी जातील. इंदिरानगर कडून सावरकरनगर कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कामगार चौक येथे प्रवेश बंद’ करण्यात आला आहे.
ही सर्व प्रकारची वाहने इंदिरानगर-रोड नं. 22-लोकमान्यनगर-यशोधननगर मार्गे इच्छित स्थळी जातील. नाल्याचे काम पूर्ण होईपर्यंत ही पर्यायी व्यवस्था राहणार आहे. पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे पोलीस उप आयुक्त बाळासाहेब पाटील यांनी कळविले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading