इंडियन मेडीकल असोसिएशनच्या ठाणे शाखेच्या अध्यक्षपदी बालरोगतज्ञ डॉ. संतोष कदम यांची बिनविरोध निवड

इंडियन मेडीकल असोसिएशनच्या ठाणे शाखेच्या अध्यक्षपदी बालरोगतज्ञ डॉ. संतोष कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे. डॉ. कदम आणि १५ डॉक्टर्स या कमिटीत असणार आहेत. ही निवड पुढील २ वर्षांसाठी आहे. डॉ. संतोष कदम गेली २ वर्ष महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे सचिव होते तर पाच वर्षापासून कार्यकारी सदस्य आहेत. गेल्या ४ महिन्यांपासून ते कोरोनाच्या साथीमध्ये नगारिकांसाठी सेवा देत असून त्यामुळे ते स्वत:च कोरोना बाधित झाले होते. परंतु कोरोनातून बाहेर पडल्यावर पुन्हा ते आपल्या सेवेत मोठ्या जोमाने हजर झाले आहेत. आयएमए ठाणेतर्फे डॉक्टरांची टीम शहरातील दवाखान्यांसाठी तयार करण्यात आली असून आयएमए तर्फे १५ खाजगी रूग्णालयं कोविड रूग्णालय म्हणून देण्यात आली असून प्रशासनाला पूर्ण सहकार्य मिळेल असं डॉ. कदम यांनी सांगितलं. डॉ. वेधस निमकर हे सचिव म्हणून तर खजिनदार म्हणून डॉ. महेश जोशी यांची निवड करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading