आयुष्यमान भव: अभियानातंर्गत बाळकूम आरोग्य केंद्रामार्फत साप्ताहिक आरोग्य मेळावा

शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आयुष्यमान भव: अभियानातंर्गत बाळकूम आरोग्य केंद्रामार्फत साप्ताहिक आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. बाळकूम परिसरात डेंग्यू, मलेरिया या आजारांचे रुग्ण वाढत असून याबाबत दोस्ती बांधकाम परिसरात जनजागृती करण्यात आली. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी काम करणारे कामगार यांना डेंग्यू, मलेरिया या आजारांची माहिती देण्यात आली. यावेळी बाळकूम परिसरात औषध आणि धूरफवारणी करण्यात आली. तसेच दोस्ती बांधकाम येथे काम करणाऱ्या कामगारांची वैद्यकी आरोग्‌य अधिकारी यांच्यामार्फत आरोग्यतपासणी करण्यात आली आणि आजाराचे निदान करुन 200 जणांना औषधोपचार देण्यात आले. तर 183 जणांचे मलेरिया, डेंग्यू याबाबतच्या चाचण्या करण्यात आल्या. 184 जणांची रक्तदाब तर 183 जणांची कुष्ठरोग तपासणी करण्यात आली. 34 जणांचे क्षयरोग एक्स रे काढण्यात आले तर 5 जणांना धनुर्वाताची लस देण्यात आली. 10 ठिकाणचे पाणी नमुने देखील यावेळी घेण्यात आले. तर मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, किडनी आजार इ. तपासणी, निदान, उपचार, संदर्भसेवांचे आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड नोंदणी देखील या मेळाव्यादरम्यान करण्यात आली.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading