आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित केल्या जाणा-या दहीहंडी उत्सवात १ लाख ११ हजार १११ रुपयाची दहीहंडी

खासदार राजन विचारे यांच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित केल्या जाणा-या दहीहंडी उत्सवात मुंबईतील गोविंदा पथकांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची १ लाख ११ हजार १११ रुपयाची तसेच ठाण्यातील गोविंदा पथकासाठी आनंद दिघे यांच्या नावाची १ लाख ११ हजार १११ रुपयाची तसेच महिलांसाठी माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या नावाची ५१ हजार रुपयाची रोख बक्षिसे आणि स्मृती चषक देण्यात येणार आहे. ही माहिती एका पत्रकार परिषदेत राजन विचारे यांनी दिली. महादहीहंडी जगभरात पोहोचून परदेशी नागरिकांना दहीहंडीचे आकर्षण निर्माण केले आहे. या सोहळ्यात युवा नेते आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, शिवसेना नेते विनायक राउत, शिवसेना उपनेते अनिता बिर्जे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांची उपस्थिती लाभणार आहे. या धर्मवीर आनंद दिघे टॉवर समोरील चौकात होणाऱ्या महादहीहंडी उत्सवाला ठाणे- मुंबई येथील गोविंद पथकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असते. गेल्या दहीहंडी महोत्सवात २०० च्या वर गोविंद पथकांनी आपली हजेरी लावली होती. महादहीहंडी आयोजना बरोबर सर्वांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्या करमणुकीसाठी महाराष्ट्रातील पारंपारिक लोककला नृत्य मराठी हिंदी गाणी असे विविध कार्यक्रम तसेच मराठी हिंदी सिनेसृष्टीतील अनेक नामावंत कलाकार या महादहीहंडी उत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यात उपस्थित राहणा-या गोविंदा पथकांसाठी ज्युपिटर हॉस्पिटलतर्फे तज्ञ डॉक्टरांचे वैद्यकीय पथक रुग्णवाहिकेसह उत्सवाच्या ठिकाणी सज्ज राहणार आहे. ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन स्थितीसाठी आवश्यकता भासल्यास ५ बेड आरक्षित करण्यात आले आहेत. संपदा हॉस्पिटलचे डॉ.उमेश आलेगावकर यांच्या संयुक्त विद्यामानाने विविध तज्ञ डॉक्टरांचे पथक ठेवण्यात आले आहे. तसेच ५०० सुरक्षा रक्षक, कार्यकर्ते सज्ज आहेत. आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे महादहीहंडी उत्सवात सहभागी होणा-या सर्व गोविंदा पथकांना विमा उतरवण्यात येणार आहे. उत्सव पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांनाही काही इजा झाल्यास त्यांनाही विम्याचे संरक्षण मिळणार आहे. दहिहंडीचे मनोरे रचत असताना शेवटच्या थरावर असणाऱ्या गोविंदाला ‘उदय आऊट डोअर’ या गिर्यारोहक संस्थेमार्फत सेफ्टी रोप देण्यात येणार आहे. जेणेकरुन गोविंदांचे खालचे थर कोसळले. तरी सर्वात वरच्या थरावर असणारा गोविंदा रोपच्या सहाय्याने सुरक्षितर राहणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading