आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – विजयकुमार गावित

आदिवासी समाज हा शिक्षणाने प्रगती करू शकतो. त्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांनी केले. मीरा भाईंदर येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहांचे लोकार्पण गावित यांच्या हस्ते करण्यात आले. आश्रमशाळेतील चांगली खेळणारी मुले एकत्र करून त्यांना चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून त्यांच्याकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करुन घेण्यात येणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ त्यासाठी विद्यार्थ्यांना कुठे जाण्याची गरज लागणार नाही.
विविध योजनांसाठी लागणारी आवश्यक असणारी कागदपत्रे आदिवासी बांधवाकडे नाहीत. त्यामुळे त्यांना योजनाचा लाभ घेता येत नाही. त्यासाठी आदिवासी बांधवाना आधारकार्ड आणि बॅंक पासबुक तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावे. जिथे जिथे जागा उपलब्ध होईल तिथे आश्रमशाळा उभारण्यात येईल. इमारत दोन वर्षामध्ये पूर्ण करण्यात येईल. आदिवासी योजनासाठी निधीची कमतरता पडणार नाही असे गावित यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading