आता महाराष्ट्र शासन मोफत देणार ऑनलाईन शिधापत्रिका

नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन सेवेद्वारे ई – शिधापत्रिका निशुल्क (मोफत) उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिधावाटप अधिकारी सु.अ. जड्यार यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासन MAHAFOOD पोर्टलवर ई- शिधापत्रिका करिता https:/rcms.mahafood.gov.in या वेबसाईटवर अर्ज करावा. अर्जदारांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाईन ई शिधापत्रिका उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्जदारास संबंधित संकेतस्थळावरून ई शिधापत्रिका डाऊनलोड करता येईल. सर्व शिधापत्रिकाधारक आणि अर्जदार यांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिधावाटप कार्यालय क्रमांक ४१ फ ठाणेचे शिधावाटप अधिकारी सु.अ. जड्यार यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन शिधापत्रिका मोफत देण्याच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना शिधावाटप कार्यालयात निष्कारण फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, मनस्ताप होणार नाही व आर्थिक फटकाही बसणार नाही तसेच ऑनलाईन प्रक्रियेमुळे शिधापत्रिकेचे काम हे अधिक सुस्पष्टतेने, अधिक पारदर्शकतेने आणि अधिक जलदतेने होऊन सर्वसामान्य नागरिकांना तत्काळ शिधापत्रिका मिळणे सोपे जाईल, असे मतही शिधावाटप अधिकारी सु.अ जड्यार यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading