ठाणे महापालिका क्षेत्रातील रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आज दिवसभरात ६४ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली. आता कोरोना बाधितांची एकूण संख्या ५६० झाली आहे. आज एकूण ३ जणांना बरे होऊन घरी पाठवण्यात आलं. तर आज एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आजपर्यंत दाखल झालेल्यांमध्ये ४३३ जण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत.