आगीमुळे बेघर झालेल्यांना महापौरांतर्फे रेंटल हौसिंगमध्ये निवारा

नौपाडा येथील मल्हार सिनेमाजवळील पार्वती निवास येथील दुमजली इमारतीला दोन दिवसांपूर्वी आग लागली होती. या आगीत बेघर झालेल्या दोन कुटुंबाना महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते महापालिकेच्या रेंटल स्कीममधील घरांच्या चाव्या देण्यात आल्या. महापौरांच्या पाठपुराव्यामुळे या बेघर कुटुंबाना अवघ्या दोन दिवसात घरे मिळाल्याने टकले कुटुंबियांना दिलासा मिळाला असून त्यांनी महापौरांची भेट घेवून आभार व्यक्त केले. पार्वती निवास या इमारतीला रविवारी आग लागली होती. या आगीत या इमारतीतील कुंदन टकले आणि रविंद्र टकले या रहिवाशांची घरे पूर्णपणे जळून खाक झाली. ही बातमी समजताच नौपाडा येथील शिवसेनेचे उपविभागप्रमुख किरण नाकती यांनी तात्काळ महापौर नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला. महापौरांनीही तातडीने या कुटुंबाशी फोनवरुन चर्चा करुन आम्ही पाठीशी आहोत, काळजी करु नका असा शब्द दिल्याने टकले कुटुंबियांना धीर मिळाला. तसेच तात्काळ महापालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करुन आगीत अडकलेल्या कुटुंबियांना शिडीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. त्याचप्रमाणे महापौरांनी महापालिकेच्या रेंटल हौसिंग स्कीममधील घरे या टकले कुटुंबियांना भाडेतत्वावर देण्याबाबत संबंधित विभागाला आदेश दिले. त्यानुसार पार्वती इमारतीतील टकले कुटुंबियांना महापौरांनी चाव्या प्रदान केल्या. आगीत पूर्णपणे उध्वस्त झालेल्या टकले कुटुंबियांना दोन दिवसात घरे मिळाल्याने या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading