अमर टॉवर इमारत दुर्घटनेतील जखमी कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीन लाखांची मदत

भास्कर कॉलनी मधील अमर टॉवर या इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींना मुख्यमंत्र्यांकडून ३ लाखांची मदत देण्यात आली. या दुर्घटनेत विजया सुर्यवंशी, त्यांची दोन मुले प्रथमेश आणि अथर्व सूर्यवंशी हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमीची विचारपूस करत उपचारामध्ये कोणतीही हयगय होणार नाही अशा सूचना देवून या कुटुंबाला तीन लाख रुपयांची मदत दिली. ही मदत शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक नरेश म्हस्के यांनी विजया सूर्यवंशी यांच्याकडे सुपुर्द केली. अमर टॉवर इमारतीच्या दुर्घटनेचे वृत्त समजताच शिवसेनेचे विभागप्रमुख किरण नाक्ती यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून जखमींना मदतकार्य सुरू केले तसेच सूर्यवंशी कुटुंबातील जखमींना नौपाड्यातील पराडकर रुग्णालय आणि कौशल्य रुग्णालय येथे दाखल केले असून सर्वांची प्रकृती स्थिर असून विजया सूर्यवंशी यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आज या दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी केली. ही इमारत 25 वर्षे जुनी असून या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करुन घेण्याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना सूचित केले. तसेच या इमारतीचा पुनर्विकास करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या वतीने रहिवाशांना दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading