अनधिकृत शाळेत प्रवेश न घेण्याचे शिक्षणाधिका-यांचे आवाहन

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील ३८ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. संबंधित संस्था चालकांनी त्यांचे संस्थेमार्फत सुरु असलेल्या अनधिकृत प्राथमिक शाळा/वर्ग तात्काळ बंद करुन तसे हमीपत्र प्राथमिक शिक्षण विभागास सादर करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी दिले आहेत. त्याचबरोबर अनधिकृत शाळामध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेवु नये असे आवाहनही कारेकर यांनी केले आहे. जिल्हातील मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, शहापूर आदी ग्रामीण तालुक्यात एकूण ३८ प्राथमिक शाळा अनधिकृत आहेत. या शाळांच्या संस्था चालकांनी अनधिकृत शाळा/वर्ग तात्काळ बंद न केल्यास संबंधित संस्था चालका विरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
अनधिकृत शाळांची यादी
अंबरनाथ तालुक्यातील गोकुळ कॉन्व्हेंट स्कूल, रेन्बो इंग्लिश स्कूल, खरड, श्री.समर्थ स्कूल नेवाळी
रुद्रा इंग्लिश मिडीयम स्कूल वांगणी (प.), प्रगती विद्या मंदिर पाले, सनशाईन इंग्लिश स्कूल उमरोली, मुरबाड तालुक्यातील ऑक्सफोर्ट पब्लिक स्कूल, भिवंडी तालुक्यातील एम.एन.तरे इंग्लिश मिडीयम स्कूल धामणगांव, इंग्लिश मिडीयम स्कूल कुंदेफाटा, नॅशनल इंग्लिश स्कूल दापोडे, लिओ इंटरनॅशनल स्कूल काल्हेर, लिओ हायस्कूल काल्हेर, वेदिका इंग्लिश मिडीयम स्कूल काल्हेर, द विनर्स इंग्लिश मिडीयम स्कूल कांबे, अवेंचुरा नॅशनल स्कूल कोन, खान सदरुद्दिन प्रायमरी स्कूल कारीवली, अग्नीमाता इंग्लिश स्कूल पिंपळास, व्ही.पी.इंग्लिश स्कूल पिपंळास, समर्थ विद्यालय तलाई पाडा पिंपळनेर, ईडू स्मार्ट इंग्लिश स्कूल सावरोली, इकरा नॅशनल स्कूल पडघे, कल्याण तालुक्यातील बी.आर.डी. स्कूल घोटसई, युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल टिटवाळा, केंन्ट ग्लोबल पब्लिक स्कूल गुरवली, राया इंग्लिश स्कूल, राया, नवज्योती बेथनी विद्यापिठ रुंदे, प्रकाश किड्स स्कूल खडवली (पुर्व.), जी.के.इंग्लिश हायस्कूल खडवली (पुर्व.), सावित्रीबाई फुले इंग्लिश प्रायमरी स्कूल म्हारळ, सावित्रीबाई फुले इंग्लिश प्रायमरी स्कूल म्हारळ, विवेकानंद इंग्लिश हायस्कूल, निलम इंग्लिश स्कूल नांदीवली, आदर्श विद्यालय लोढा हेवन निळजे, डीन्गेटी कॉन्व्हेंट स्कूल कोळेगांव, सरस्वती इंग्लिश स्कूल दहिसर, आयडीएल इंग्लिश स्कूल पिंपरी, शहापूर तालुक्यातील एम.आर.राणे प्राथमिक शाळा आसनगांव, शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल शेरे, एम.जे.वर्ल्ड स्कूल आदि शाळा या अनधिकृत शाळा म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading