अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरूणा ढेरे यांचा ठाण्यात सत्कार

यवतमाळ येथे होणा-या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका अरूणा ढेरे यांचा येत्या रविवारी ठाण्यात जाहिर सत्कार होणार आहे. मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीनं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरूणा ढेरे यांचा जाहीर सत्कार येत्या रविवारी सकाळी साडेदहा वाजता स्टेशन रस्त्यावरील मराठी ग्रंथसंग्रहालयात होणार आहे. यावेळी संकेत म्हात्रे, आदित्य दवणे, गीतेश शिंदे, संजीव फडके, भाग्यश्री फडके हे कवी अरूणा ढेरे यांच्या कविता सादर करतील. ज्या संस्थांना अरूणा ढेरे यांचा सत्कार करायचा असेल त्यांनी संस्थेकडे लिखित स्वरूपात आपली नावं द्यावीत असं आवाहन मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading