अखंड भारत व्यासपीठ या स्वयंसेवी संस्थेच्या सर्व समावेशक हिंदुत्व या संकल्पनेवर आधारीत दिवाळी अंकाचं प्रकाशन ख्यातनाम शिल्पकार प्रदीप शिंदे यांच्या हस्ते झालं. या दिवाळी अंकात १६ लेख आहेत. धनश्री लेले, नरेंद्र जोशी, प्रशांत धर्माधिकारी, वि. भा. देशपांडे, सुरेश खेडेकर या आणि अन्य लेखकांनी हिंदुत्वाच्या सर्वसमावेशकतेचा पट उलगडून दाखवला आहे. यंदा या अंकाचे अतिथी संपादक मकरंद मुळे असून त्यांनी या दिवाळी अंकाविषयी माहिती दिली.