अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री रोखण्यासाठी ग्रामीण पोलीसांच्या कार्यक्षेत्रातील बंद पडलेल्या रासायनिक कंपन्यांची दरमहा विशेष गटामार्फत तपासणी

जिल्ह्यातील ग्रामीण भागात अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री रोखण्यासाठी ग्रामीण पोलीसांच्या कार्यक्षेत्रातील बंद पडलेल्या रासायनिक कंपन्यांची दरमहा विशेष गटामार्फत तपासणी करावी. तसेच वारंवार एकाच पत्त्यावरून येणाऱ्या तसेच परदेशातून येणाऱ्या कुरियरवर लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिले. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक विक्रम देशमाने यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे झाली. जिल्ह्यात अमंली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहण्याच्या सूचना पोलिस अधिक्षक देशमाने यांनी यावेळी दिल्या. तसेच जिल्ह्यात अमंली पदार्थाविषयी जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्रामीण भागातील भिवंडी येथील गोदामांची पोलीसांच्या मदतीने तपासणी करण्याच्या तसेच बंद असलेल्या एमआयडीसीमधील कंपन्यांची माहिती गोळा करण्याच्या सूचनाही देशमाने यांनी यावेळी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading