अंबरनाथमधील कोंडेश्वर शिवमंदिर येथे ४ युवकांचा पाण्याच्या कुंडात पोहताना अंदाज न आल्याने बुडून मृत्यू

अंबरनाथमधील कोंडेश्वर शिवमंदिर येथे ४ युवकांचा पाण्याच्या कुंडात पोहताना अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. काल संध्याकाळच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे आलेल्या माहितीनुसार कोंडेश्वर येथील पाण्याच्या कुंडात पोहण्यासाठी घाटकोपर येथील स्वयम् मांजरेकर, आकाश झिंगा, सूरज साळवे आणि लिनस उच्चपवार हे ४ जण उतरले होते. परंतु पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान, बदलापूर पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या चारही मुलांचे मृतदेह बाहेर कराढून पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading