संस्कृती आर्टस् फेस्टीवल यंदा ११ ते १४ जानेवारी दरम्यान

संस्कृती आर्टस् फेस्टीवल यंदा ११ ते १४ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. संस्कृती आर्टस् फेस्टीवलचे संस्थापक आमदार प्रताप सरनाईक यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या महोत्सवाचं यंदाचं हे ५वं वर्ष आहे. संस्कृती आर्टस् फेस्टीवलने यंदा आपले पर्यावरण-रक्षण हा विषय घेतला आहे. महोत्सवाच्या माध्यमातून पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण याबाबत जनजागृती केली जाणार आहे. यंदाच्या संस्कृती आर्टस् फेस्टीवलमध्ये सुप्रसिध्द संगीतकार दर्शन रावल, मित ब्रदर्स, गझल नवाझ जसविंदरसिंग आणि इंडोकिवी युट्यूब ग्रेट शरले सेटीया सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर ६०० हून अधिक देश विदेशातील प्रसिध्द कलाकार या महोत्सवात आपली कला सादर करणार आहेत. संस्कृती आर्टस् फेस्टीवलमध्ये भारतीय हस्तकला, खाद्यपदार्थ, प्रकाश आणि लेझर शो, हस्तकला कार्यशाळा आणि साहस स्पर्धा अशी विविध दालनं असणार आहेत. अधिक माहितीसाठी संस्कृती आर्टस् फेस्टीवल डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading