श्रीमलंग गडावरील फ्युनिक्युलर रेल्वे उभारणा-या ठेकेदाराचं काम काढून घेण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

श्रीमलंग गडावरील फ्युनिक्युलर रेल्वे उभारणा-या ठेकेदाराचं काम काढून घेण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. लाखो भाविकांचं श्रध्दास्थान असलेल्या श्रीमलंग गडावर फ्युनिक्युलर रेल्वेनं जाण्याचं भाविकांचं स्वप्न बरंच रखडलं असून हे काम करणा-या सुप्रिम इन्फ्रा करून हे काम काढून घेण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. २०१२ मध्ये सुप्रिम इन्फ्राला हे काम देण्यात आलं होतं. २ वर्षाचा कालावधी यासाठी देण्यात आला होता. त्यानंतर दिलेल्या मुदतवाढीचा कालावधी डिसेंबर २०१७ मध्ये संपला पण अद्यापही काम पूर्ण झालेलं नाही. २२ एप्रिल २०१७ मध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला होता. त्यावेळी ८० टक्के काम पूर्ण झालं होतं. हे काम तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते पण तरीही हे काम पूर्ण झालं नाही. या फ्युनिक्युलरचे एकूण ४ डबे असून एका वेळेला २ डबे गडावर जातील आणि २ डबे खाली येतील अशी रचना आहे. दर ६ मिनिटांनी ही सुविधा दिली जाणार आहे. प्रत्येक डब्यात ६० लोकं बसण्याची क्षमता असून हे डबे पूर्णपणे वातानुकुलित आहेत. याशिता ऑटोमोटिव्हचे वसंत जोशी सध्या या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी पार पाडत आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: