शेतक-यांना विश्वासात घेऊनच मेट्रोच्या कास्टींग यार्डास सुरूवात करण्याची प्रताप सरनाईक यांची मागणी

शेतक-यांना विश्वासात घेऊनच मेट्रोच्या कास्टींग यार्डास सुरूवात करावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. शेतक-यांच्या विरोधानंतर या कामास स्थगिती देण्यात आली आहे. मेट्रो कास्टींग यार्डच्या काही जागेवर स्थानिक शेतक-यांची कब्जे वहिवाट आहे. शेतक-यांचा कास्टींग यार्डला विरोध नाही तर जागेचा मोबदला किंवा भाडं मिळावं अशी शेतक-यांची मागणी आहे. शेतक-यांची ही जमीन एकमेव उदरनिर्वाहाचं साधन आहे. काल या जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असता या ठिकाणी भराव टाकण्याचं काम सुरू होतं. आता या कामास स्थगिती देण्यात आली आहे. शेतक-यांना विश्वासात घेऊनच काम करावं असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading