ठाण्यातील गांधीनगर प्रभाग ५ मधील शिवसेना नगरसेवक संजय पांडे यांचा मुलगा नील पांडे यानं हवेत गोळीबार केल्यानं खळबळ उडाली आहे.दोन दिवसापूर्वी लोणावळा येथे आपल्या वाढदिवसानिमित्त हवेत गोळीबार करतानाचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानं ही बाब पुढे आली आहे. भारतीय जनता पक्ष सोडून शिवसेनेत पदार्पण केलेले नगरसेवक संजय पांडे हे पेशानं बांधकाम व्यावसायिक असून त्यांच्या अनेक गृहनिर्माण पुनर्विकास योजना वादात सापडल्या आहेत. आता त्यांच्या चिरंजीवानं बंदूकबाजी केल्यानं पांडे अडचणीत येण्याची चिन्हं आहेत. लोणावळा येथे वाढदिवस साजरा करत असताना नील यानं हवेत गोळीबार केल्याचं व्हीडीओमध्ये दिसत आहे. या व्हीडीओची दखल पोलीस घेतील का असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
