शाहू मार्केटमधील एका गाळेधारकानं जबरदस्तीने आपल्याला हटवण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल लावलेल्या फलकानं खळबळ

शाहू मार्केटमधील एका गाळेधारकानं आपल्याला स्थानिक राजकारणी, पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी जबरदस्तीने हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचे फलक लावल्यानं खळबळ उडाली आहे. ठाणे महापालिकेनं शाहू मार्केटमध्ये रस्ता रूंदीकरणात विस्थापित झालेल्यांचं पुनर्वसन केलं आहे. मात्र तेथील एका गाळेधारकानं आपल्याला जबरदस्तीने येथून हटवलं जात असल्याचा आरोप केला आहे. यासाठी त्यानं शाहू मार्केटच्या बाहेर एक फलकच लावला आहे. या फलकावर गाळेधारकानं आपल्याला जबरदस्तीनं हटवण्यासाठी कोणाकोणाचे कसे प्रयत्न सुरू आहेत याचा नावासकट उल्लेख केला असून आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. सध्या हा फलक येणा-या जाणा-यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: