शहरामध्ये क्लोज सर्किट कॅमेरे उभारून त्याच्या नोंदी न जपणा-या पोलीस ठाण्यांची विशेष चौकशी करण्याची संजीव दत्ता यांची मागणी

ठाणे शहरामध्ये क्लोज सर्किट कॅमेरे उभारून त्याच्या नोंदी न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे न जपणा-या पोलीस ठाण्यांची विशेष चौकशी करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते संजीव दत्ता यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडे केली आहे. न्यायालयानं सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत आणि त्यांच्या नोंदी किमान एक वर्ष कालावधीपर्यंत संकलित करून ठेवण्याचे बंधनकारक केलं होतं. प्रत्येक पोलीस ठाण्यातील क्लोज सर्किट कॅमेरा अद्ययावत आणि सुरू आहे का तसंच त्याच्या नोंदी नियमित संकलित होतात का याची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकावर टाकण्यात आली होती. मात्र ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामधील पोलीस ठाण्यांमध्ये अशा नोंदी ठेवल्या जात नसल्याचं माहिती अधिकारातून समोर आलं आहे. हा प्रकार म्हणजे न्यायालयीन आदेशाचा अवमान आहे. याबाबत संजीव दत्ता यांनी सर्वोच्च न्यायालयापासून पोलीस आयुक्तांपर्यंत पुराव्यांसह लेखी तक्रार करून ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांची चौकशी करावी आणि न्यायालयानं दिलेल्या आदेशाचा अवमान करणा-या संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: