एका रिक्षा चालकानं वाहतूक शाखेच्या पोलीस हवालदाराला धक्काबुक्की करण्याचा प्रकार काल रात्री घडला आहे. लोकमान्य नगरमध्ये राहणा-या शिवाजी घुटूगडे यानं आपली रिक्षा ना प्रवेश क्षेत्रातून भर वेगानं आणली आणि लोकांच्या जिवीतास धोका उत्पन्न केला. त्यामुळं रंगो बापूजी चौकामध्ये वाहतूक नियमनासाठी कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार सुनिल गणपते यांनी त्याला थांबवलं आणि त्याच्याकडे लायसन्सची मागणी केली. त्याला नकार देत घुटुगडे यांनी गणपते यांची कॉलर पकडली आणि त्यांना धक्काबुक्की केली. वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक ए. पी. लंबाते यांच्याशीही त्यानं उध्दट वर्तन केलं. त्यामुळं सरकारी कामात अडथळा आणला म्हणून शिवाजी घुटुगडे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
