येऊरच्या बंगले धारकांवर बंगल्यात गोंधळ झाल्यास कारवाई करण्याचा पोलीसांचा इशारा

नववर्षाच्या पूर्वसंध्येला येऊर परिसरात धांगडधिंगा झाल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीसांनी बंगले धारकांना दिला आहे. येऊरच्या निसर्गरम्य परिसरात अनेक बंगले असून नववर्षाच्या पार्ट्या अशा बंगल्यांमधून केल्या जातात. येऊन हे शांतता परिसर म्हणून घोषित करण्यात आलं आहे. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून मोठमोठ्या आवाजात डीजे लावून दारूच्या पार्ट्या केल्या जातात. पोलीसांनी अशाप्रकारच्या पार्ट्यांसाठी बंगले भाड्याने देऊ नये असं आवाहन बंगले धारकांना केलं आहे. बंगले धारकांनी आपले बंगले पार्ट्यांसाठी भाड्याने दिल्यास आणि गडबड अथवा धांगडधिंगा झाल्यास बंगल्याच्या मालकांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीसांनी दिला आहे. येऊर आणि उपवन परिसरात नववर्षाच्या पूर्वसंध्येवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. येऊर उपवन परिसरात नाकाबंदी केली जाणार असून बीट मार्शल, भरारी पथकं, गस्त घातली जाणार आहे. दारू पिऊन धिंगाणा करणारे, वेगाने वाहनं चालवणारे, दारू पिऊन वाहन चालवणा-यांवर तसंच महिलांची छेडछाड करणा-यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीसांनी दिला आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: