युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर पीआरटीएस चे सादरीकरण

शहरातून जाणारी मेट्रोची मार्गिका आणि अंतर्गत मेट्रोच्या मार्गिकेशी जोडणा-या वैयक्तीक जलद वाहतूक यंत्रणा म्हणजे पीआरटीएस चे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. पालिका आयुक्तांनी सादर केलेल्या या सादरीकरणावर समाधान व्यक्त करून हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीनं काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वैयक्तीक जलद वाहतूक यंत्रणा या प्रकल्पाविषयी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ६ महिन्यापूर्वीच महापालिका आयुक्तांशी चर्चा केली होती. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीनं हा प्रकल्प कसा राबवता येईल याबाबत सूचित केले होते. त्यानंतर तज्ञ सल्लागारांच्या माध्यमातून या प्रकल्पाचा अहवाल तयार करून त्याचं पालकमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर तो सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला होता. वैयक्तीक जलद वाहतूक यंत्रणा प्रकल्पाला सर्वसाधारण सभेनं मंजुरी दिली असून या प्रकल्पाचा आर्थिक प्रस्ताव फेब्रुवारीपर्यंत सर्वसाधारण सभेत सादर करण्याचे आदित्य ठाकरे यांनी सूचित केले. अतिशय महत्वकांक्षी असा हा प्रकल्प पाच टप्प्यात राबवण्यात येणार आहे. पहिला आणि पाचवा टप्पा एकत्रितपणे राबवण्यात येणार असून एकूण १०३ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचा पहिला आणि पाचवा टप्पा मिळून ३४ किलोमीटरच्या मार्गावर ६० स्थानकं उभारण्यात येणार आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: