मेट्रोची प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर होण्याच्या दृष्टीनं महापालिका आयुक्तांची जर्मनीतील बँकेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि मेट्रोच्या अधिका-यांसमवेत चर्चा

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणा-या अंतर्गत मेट्रोची प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर होण्याच्या दृष्टीनं महापालिका आयुक्तांनी जर्मनीतील बँकेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि मेट्रोच्या अधिका-यांसमवेत चर्चा केली. या चर्चेमध्ये ऑक्टोबर २०१९ पर्यंत अंतर्गत मेट्रोच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या बैठकीमध्ये प्रकल्प अहवालास राज्य शासनाची मान्यता मिळवणं आणि त्यानंतर केंद्र आणि गृहनिर्माण विभागाकडे मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे. केंद्रीय नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाअंतर्गत काम करणारे पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड आणि केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणा-या आर्थिक विभागामार्फत प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून मान्यता देण्यात येणार आहे. केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यानंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून हा प्रकल्प वित्तीय सहाय्यासाठी जर्मन दूतावासाकडे पाठवण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जर्मनीतील के. एफ. डब्ल्यू डेव्हलपमेंट बँकेचे अधिकारी अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा अभ्यास करून या प्रकल्पाला अतिशय अल्पदरानं अर्थ सहाय्याबाबत निर्णय घेणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading